वादळी वार्‍यामुळे शहरात अनेक ठिकाणी पडझड

दमट वातावरणामुळे उकाडा असह्य; महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित
वादळी वार्‍यामुळे शहरात अनेक ठिकाणी पडझड

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

वातावरणातील बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळचा फटका सहन करावा लागला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यात देखील दिसून आला असून दुपारच्या सुमारास वादळीवार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे जळगावकरांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्याला चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हे वादळ राज्यातील कोकण किनारपट्टीवरुन धडकले आहे. राज्य शासनाकडून अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे अनेक जिल्ह्यात पावसाने हजरी देखील लावली आहे. यातच जळगाव जिल्ह्यात रविवारी दुपारी प्रचंड उन्हाच्या झळा बसत होत्या. मात्र दुपानंतर ढगाळ वातावरण झाल्याने प्रचंड उकाडा होत होता. परंतु त्यानंतर अचानक पावसाच्या सरींनी हजेरी लावली. सुमारे अर्धातास पावसाची रिपरीप सुरु होती. त्यामुळे वातावरणात बदल होवून काहीकाळ गारवा निर्माण झाला होता.

सायंकाळनंतर वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट

पावसाची रिपरीप बंद होताच पुन्हा असह्य असा उकाडा सहन करवा लागत होता. मात्र सायंकाळनंतर पुन्हा वातावरणात बदल होत जोरदार वादळीवार्‍याला सुरुवात झाली. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरु झाल्याने पावासाला देखील सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी वातावरणात बदल होत गारवा निर्माण झाला होता.

बत्ती गुल

वादळी वार्‍याला सुरुवात होताच महावितरणकडून शहरातील विद्युत पुरवठा खडडीत करण्यात आला. दमट वातावरणामुळे होत असलेला उकडा व महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचा उकाड्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

वादळी वार्‍यामुळे फलकांचे नुकसान

दुपारपासून वादळी वार्‍याला सुरुवात झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी लावलेली होर्डींग्स व हॉटेल्सच्या नावाचे फलक तुटून रस्त्यावर पडले. सुदैवाने रस्त्यावर वाहतुक नसल्याने कुठलीही हानी झाली नाही. तसेच अनेक परिसरात झाडांच्या फांद्या देखील तुटून पडल्या होत्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com