रेल्वेच्या बनावट तिकिटांची विक्री : एकास अटक

आरपीएफ पथकाकडून कारवाई
रेल्वेच्या बनावट तिकिटांची विक्री : एकास अटक

जळगाव - Jalgaon

बनावट आयडी कार्डव्दारे रेल्वे तिकीट विक्रीचा काळाबाजार करणार्‍या पंकज बारी नामक युवकास जुने जळगाव परीसरातील त्याच्या रहात्या घरून रेल्वे पोलिस पथकाने कारवाई करीत ताब्यात घेण्याची घटना आज दि. १ आक्टेाबर रोजी उघडकीस आली आहे.

अधिकृत आयडी असतांना बनावट आयडी व्दारे रेल्वे तिकीटांचा काळाबाजार, अफरातफर करीत असल्याची माहिती सायबर सेलव्दारे रेल्वे पोलिसांना मिळाली होती. यावरून जूने जळगाव परीसरातील तेली चौकातून संदिप प्रोव्हिजनचा पंकज बारी या तरूणास अटक करण्यात आली असून अजून काही माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे रेल्वेचे अनधिकृत तिकीट विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे.

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणार्‍यामधे आणखी कोण कोण आहेत याची संशयिताकडून अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे जळगाव रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सी.एम.पटेल यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com