जळगाव : रासायनिक खते तत्काळ उपलब्ध करा

जळगाव : रासायनिक खते तत्काळ उपलब्ध करा

जी.प.सभापती रविंद्र पाटील यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

यावल - प्रतिनिधी Yaval

जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळण्यास विलंब लागत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ रासायनिक खते उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्यकार्यकारी बी.एन.पाटील, मुख्य लेखा वित्त विभागाचे गायकवाड, डॉ.पांढरे उपस्थित होते.

जिल्हयात यावर्षी समाधनकारक पाऊस झालेला असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. तथापी आपल्या जिल्हयात रासायनिक खतांची व कृषि विषयक औषधींची उपलब्धता होत नसल्याचे निर्दशनास येत आहे. शेतकरी वर्ग खते मिळवण्यासाठी सकाळी ५ वाजेपासून रांगेत उभे राहत आहे तरी देखील खतांची उपलब्धता होत नाही.

प्राधान्याने युरीया खतांची पिंकांच्या वाढीसाठी आवश्यकता असल्याने त्याची उपलब्धता स्थानिक दुकानदारांकडे

होत नाही. तरी जिल्हयातील कृषि विभाग व दुकानदार यांना आपल्या स्तरावरुन युरीया खते व इतर कृषि विषयक खते व औषधी तात्काळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com