पाकिजा पटेल यांना "महाराष्ट्र गौरव" पुरस्कार

जन्मताच बोलू न शकणाऱ्या विद्यार्थिनीला बोलायला शिकविले
पाकिजा पटेल यांना "महाराष्ट्र गौरव" पुरस्कार

शेळावे । वार्ताहर। Shelave

येथून जवळ असलेले जि.प.प्राथमिक शाळा राजवड येथील उपक्रमशील मुख्याध्यापिका व महिला शिक्षक संघटना जिल्हाध्यक्षा पाकिजा पटेल (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त) यांना सेवक सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय "महाराष्ट्र गौरव" पुरस्कार जाहिर झाला.

त्यांनी करोना काळात विविध उपक्रम राबविले शाळेतील सर्व वर्ग डिजिटल केले तसेच ऑनलाईन शिक्षण, दिक्षा अप वापर विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जन्मताच बोलू न शकणाऱ्या विद्यार्थिनीला त्यांनी शाळेत प्रवेश दिला व तिला बोलायला शिकविले. राजवड शाळेत नेहमीच विविध उपक्रम व स्पर्धा त्या घेत असतात.

यापूर्वीही पाकिजा पटेल यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराने राजवड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील व जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील नगराध्यक्ष अमळनेर यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com