नोंदणीकृत घरेलू कामगारांनी त्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अद्यावत करा!

कामगार विभागाचे आवाहन
नोंदणीकृत घरेलू कामगारांनी त्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अद्यावत करा!
USER

जळगाव - Jalgaon

सहाय्यक कामगार आयुक्त (Labor Commissioner), जळगाव यांचेमार्फत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे (Maharashtra Domestic Workers Welfare Board) नोंदणी व लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते.

कोविड-19 (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर (Government of Maharashtra) महाराष्ट्र शासनाने सर्व नोंदीत घरेलू कामगारांना 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव कार्यालयातंर्गत सन 2011 ते 31 मार्च, 2021 या कालावधीत सुमारे 14 हजार घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

मात्र बहूतांश घरेलू कामगारांचा बँक तपशील (Bank details) नसल्यामुळे अर्थसहाय्य वाटप करणे शक्य होत नाही. तरी सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव कार्यालयाकडे नोंदीत सर्व घरेलू कामगारांनी त्यांची वैयक्तिक माहिती व बँकेचा तपशिल https://public.mlwb.in/public या लिंकचा वापर करुन अद्यावत करावा. याबाबत काही अडचण असल्यास सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांचे कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन चद्रकांत बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com