शीर नसलेल्या बनावट भुताचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या बाबाचा पर्दाफाश

शीर नसलेल्या बनावट भुताचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या बाबाचा पर्दाफाश

देऊळगाव गुजरी- वार्ताहर Jamner

जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी परिसरात तिन ते चार दिवस आगोदर शीर नसले धड व स्त्री अशा भुतांचा बनावट व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

याच व्हिडिओने देऊळगाव, तोरणाळा, पठाळ, फाटा या परिसरातील नागरिकांमध्ये भयंकर भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु हा सदर बनावट व्हिडिओ व्हायरल करणारा भोंदू बाबाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. भोकरदन तालुक्यातील शेलुद येथून जमील शहा आयुब शाह उर्फ सलमान बाबा हा जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे दोन ते तीन वर्षे अगोदर वास्तव्यात आला आहे, या बाबाने दोन ते तीन वर्ष पासून या परिसरात अंधश्रद्धेचा धुमाकूळ घातला असून अनेकांना काळे धन, भुताटकी, करणी, भूत पिशाच उतरवणे अशा अनेक कारणासाठी लाखो रुपयांची जनतेची फसवणूक करून अंधश्रद्धा पसरण्याची चर्चा जनतेत बरेच दिवसापासून होत आहे.

परंतु आता चक्क या भोंदू बाबाने हद्दच पार केली रात्रीच्या सुमारे एक वाजेच्या दरम्यान तोरणाळा पठाळ फाटा या परिसरात आपल्यातीलच एका तरुणाला निवस्त्र अवस्थेत तर दुसऱ्या तरुणाला साडी नेसवली एकाच सरळ तर दुसऱ्या उलट्या पावलाने चालताना व काड्या कपड्याने शीर लपवून चित्रण तयार केले. शीर नसलेल्या धडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

सदर घटनेचा प्रकार लक्षात येताच पहुर पोलीस स्टेशनचे पी.आय.धनवडे यांनी देऊळगाव तोरणाळा पठाळ फाटा या ठिकाणी समक्ष भेट देऊन आपल्या टीमचे अनिल सुरवाडे, किरण शिंपी, ईश्वर देशमुख, दिनेश मारुडकर, इत्यादी पोलिस कर्मचाऱ्यांसह सदर घटनेची चौकशी केली.

हा व्हिडीओ बनावट व खोटा असून असा कोणताही भुताचा प्रकार नसून हा जनतेला घाबरवण्याचा प्रकार आहे तरी कोणीही या भुताच्या व्हिडिओ वर विश्वास न ठेवता अशा भोंदू बाबांच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये असे आवाहन व मार्गदर्शन करून नागरिकांच्या मनातील भीती दूर केली. तसेच हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या सलमान बाबा व त्याचे सहकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून पुढील तपास पहूर पोलिस करीत आहेत.

Related Stories

No stories found.