जिल्ह्यात शेतकर्‍यांकडून 44 कोटींचा भरणा

महाकृषी ऊर्जा अभियानाला प्रतिसाद
जिल्ह्यात शेतकर्‍यांकडून 44 कोटींचा भरणा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यभरात शेतकर्‍यांसाठी आंदोलन होता असतांना दुसरीकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने थकबाकीत 66 टक्के सवलत मिळवित जवळपास 35 हजार 386 शेतकर्‍यांनी 44 कोटी 34 लाखांचा भरणा केल आहे.

या अभियानातील सहभागासोबतच आपल्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी तब्बल 53 कोटींचा हक्काचा 66 टक्के निधीही या शेतकर्‍यांना मिळणार आहे.

महा कृषी ऊर्जा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्यातील शेतकर्‍यांसह जळगाव जिल्हयातील शेतकर्‍यांनीही पुढाकार घेतला आहे.

या अभियानात कृषिपंपांच्या वीजबिलापोटी जळगाव जिल्ह्यातील 35 हजार 386 शेतकर्‍यांनी 44 कोटी 34 लाख भरले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून वीजबिलांच्या वसुलीमधील तब्बल 66 टक्के रकमेचा निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

या महत्त्वाच्या तरतुदीमुळे शेतकरी बिल भरण्यास प्रतिसाद देत आहेत. मागील वर्षी 1 एप्रिल 2020 पासून जमा होणार्‍या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व शेतकर्‍यांचे अभिनंदन केले असून शेतकर्‍यांनी थकबाकीमुक्तीसह ग्रामपंचायत व जिल्ह्यातील वीजविषयक विकासासाठी गावकर्‍यांनी यापुढेही सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com