अजिंठा चौफुलीजवळ ट्रक पलटी झाल्याने माठ विक्रेत्यांचे नुकसान

सुदैवाने जिवीतहानी टळली
अजिंठा चौफुलीजवळ ट्रक पलटी झाल्याने माठ विक्रेत्यांचे नुकसान

जळगाव - Jalgaon

आज दि.१८ जून रोजी दुपारी अजिंठा चौफुली जवळ ट्रक पलटी आला. मात्र सुदैवाने यात जिवीतहानी झाली नसली तरी रस्त्याच्या कडेला ‘गरीबांचे फ्रिज’ माठ विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

याठिकाणी नेहमी गर्दी असते. हा अपघात घडला तेव्हा सुदैवाने रस्त्याच्या बाजूने जाणारे किंवा माठ खरेदीसाठी आलेले नागरीक व माठ विक्रेते बाल बाल बचावल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

महामार्गावरील रहदारी ठप्प झाली होती. पोलीस आल्यानंतर मार्ग मोकळा करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com