‘लॉकडाऊन’ मुळे व्यापारी आर्थिक डबघाईत

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ‘अनलॉक’ ची प्रक्रिया सुरु करण्याची अपेक्षा
‘लॉकडाऊन’ मुळे व्यापारी आर्थिक डबघाईत

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यासह देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय पुढे केला गेला.

त्यामुळे काही प्रमाणात करोनाची साखळी तुटण्यास निश्चितपणे मदत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यशासनाने 5 एप्रिल पासून कडक निर्बंध लागू केल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण प्रतिष्ठानांवर निर्बंध लादण्यात आले आहे. या निर्बंधामुळे व्यापारी डबघाईस आलेला आहे. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ‘अनलॉक’ ची प्रक्रिया सुरु करायला हवी. अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होवू लागली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमिवर बाधितांच्या वाढत्या संख्येचा आलेख लक्षात घेता, राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता जीवनाश्वक वस्तुंसाठी सकाळी 7 ते 11 वाजेची वेळ निर्धारीत केली आहे. मात्र, अन्य व्यापार पुर्णपणे बंद आहे. गेल्या दिड महिन्यांपासून व्यापार बंद असल्याने व्यापारी वर्गांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. दुकानाचे भाडे, दुकानातील कामगारांचे पगार, दैनंदिन खर्च, व्याज, वीजबील अशा अनेक बाबींमुळे व्यापार्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. व्यापार बंद असल्यामुळे ग्राहकदेखील मेटाकुटीस आला आहे. वास्तविक पाहता, राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र आता, ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ‘अनलॉक’ ची प्रक्रिया 1 जून पासून टप्प्याटप्प्याने सुरु करावी. अशी अपेक्षा अखिल भारतीय ट्रेडर्स असोसिएशनचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनमुळे पुर्णतः व्यापार बंद आहे. परिणामी आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आटोक्यात आलेली आहे. त्यामुळे आता, टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु करायला हवी. जेणेकरुन विस्कटलेली आर्थिक घडी पुर्वपदावर येईल. अनलॉकची प्रक्रिया सुरु करावी याबाबत मुख्यमंत्र्यांना ईमेलव्दारे निवेदन पाठविणार आहे.

पुरुषोत्तम टावरी, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष, अखिल भारतीय ट्रेडर्स असोसिएशन

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून कठोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता, आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. त्यामुळे छोटे-छोटे व्यापार, मध्यम व्यापार सुरु करावे. 1 जून पासून टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया राबविल्यास त्याच निश्चितपणे व्यापार्‍यांना किंबहूना विस्कटलेली घडी पुर्वपदावर येण्यासाठी हातभार लागणे शक्य होणार आहे.

जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होईल त्यामुळे शेतीच्या कामांची लगबग असते. त्यासाठी प्लास्टीक, ताडपत्री, छत्री अशा वस्तुंची गरज भासते. तसेच वादळी वार्‍यामुळे विजेचा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. त्यासाठी इलेक्ट्रीकल वस्तुंची आवश्यकता असल्यामुळे ग्राहकांना गरज भासते. त्यामुळे राज्य शासनाने अनलॉकची प्रक्रिया राबवून शिथीलता देणे अपेक्षित आहे. अनलॉक झाल्यानंतर खरेदीसाठी निश्चितच गर्दी होईल. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून नियमांचे पालन करणे अपेक्षित असल्याचे मत टावरी यांनी व्यक्त केले.

ई-पासमुळे अनेक अडचणी

कडक निर्बंधासह आंतरजिल्हा बंदी करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार प्रवासासाठी ई-पासची मुभा देण्यात आली आहे. मात्र ई-पाससाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने 1 जून पासून ई-पास बंद करावी. अशी मागणी टावरी यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com