जळगाव, भुसावळ, अमळनेरला पुन्हा लॉकडाऊन
जळगाव

जळगाव, भुसावळ, अमळनेरला पुन्हा लॉकडाऊन

दि.७ ते १३ जुलै पर्यंत राहणार बंद

Rajendra Patil

जळगाव -

जिल्ह्यात कोव्डि-१९ विषाणूचा वाढता प्रसार व वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या करोना बाधितांची संघ्या व हॉटस्पॉटच्या ठिकाणी निर्बंध लागू करण्याच्या उद्देशाने जळगाव शहर महापालिका क्षेत्र, भुसावळ, अमळनेर नगरपालिका क्षेत्रात दि. ७ जुलै सकाळी ५ वाजेपासून ते दि.१३ जुलै चे रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

या काळात सर्व औषधी दुकाने, दुध विक्री व खरेदी व्यवहार केंद्रे सुरू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केवळ ठोक, घाऊक खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू राहतील.अत्याश्यक सेवेमध्ये समाविष्य असणारी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू राहतील. यासह काही सुचनाही या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. सदर आदेश हा केवळ जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर महापालिका, भुसावळ, अमळनेर नगरपालिका क्षेत्राकरीताच लागू असेल. तर जिल्ह्यातील उर्वरीत क्षेत्रातील व्यवहार हे दि. २ जुलै रोजी नमूद केलेल्या बाबींनुसार सुरू राहतील.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com