जळगाव - Jalgaon

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशान्व्ये जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधीत 28 फेब्रुवारी, 2021 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे.

लॉकडाऊन कालावधीत लागू करण्यात आलेले निर्बध शिथिल करण्याबाबत निर्देश दिले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथील करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देशही पुढील आदेश होईपावेतो लागू राहतील.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिल, असे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.