11 वाजेनंतर शहर लॉक

11 वाजेनंतर शहर लॉक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा कहर रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे.

शासनाकडून अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. 11 वाजेनंतर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होत असल्याने येणार्‍या जाणार्‍यांची कसून चौकशी केली जात आहे.

तसेच कोरोनाचा कहर करण्यासाठी जळगावकरांनी स्वत:हून नियमांची अंमलबजावणी करीत असल्याने शहरात हा लॉकडाऊनला शंभरटक्के प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाकडून बे्रक द चैन अंतर्गत राज्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील किरणा दुकाने, भाजीपाला, दूध विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतची वेळ ठरवून दिली आहे.

त्यामुळे सकाळी 7 वाजेपासून नागरिकांची भाजीपाला किरणा साहित्य व दूध खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत आहे. 11 वाजेनंतर पोलिसांकडून सर्व दुकाने बंद करीत रस्त्यावर बंदोबस्त तैनात होत आहे.

त्यामुळे येणार्‍या- जाणार्‍यांची त्याच्याकडून कसून चौकशी केली जात असूनविनाकारण फिरणार्‍यांना त्यांच्याकडून चांगलाच चोप दिला जात असल्याचे दिसून आले. अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना व्यवसाय करण्यासाठी वेळेची मर्यादा आखून दिली आहे.

मात्र काही व्यवसायीक वेळेचे नियम धाब्यावर बसवित वेळेनंतर देखील पोलिसांसह मनपा पथकाच्या नजरेआड व्यवसाय करीत असल्याने चोरी चेारी छुपके छुपके व्यास करीत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोलीस प्रशासनाने शहरातील चौकाचौकात नाकाबंदी केली असून, विनाकारण फिरणार्‍या तरुणांची रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे.

तसेच निगेटीव्ह अहवाल आढळलेल्या वाहनधारकांना दंडही करण्यात येत आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये रवाना करण्यात येत आहे. या कारवाईने कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com