दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र देणार्‍या रॅकेटला बसणार चाप

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी याद्या प्रसिद्ध
दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र देणार्‍या रॅकेटला बसणार चाप
Jalgaon ZP

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेतील वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय 10 टक्के व विनंतीनुरुप 10 टक्के बदल्या समुपदेशानाद्वारे करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठीचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्यात अंतर्गत बदल्यासाठी सादर करण्यात आलेल्या दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र देणार्‍यांचे रॅकेट जिल्ह्यात कार्यरत असून आत बदलीपात्र संबंधित कर्मचार्‍यांकडे खोटे प्रमाणपत्र आढळल्यास थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जि.प.सीईओ पंकज आशिया यांनी संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत.

त्यामुळे सोयीच्या बदल्या करुन घेण्यासाठी अनेक कर्मचारी जिल्हा सामान्य रुग्णालयात आर्थिक घेवाण-घेवाण करुन दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र सादर करुन लाभ घेत असल्याचे प्रकार मागील काही घटनावरुन समोर आले आहे. यंदा अशा बदल्यांना सीईओ पंकज आशिया चाप लावणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ग्रामविकास विभागाने हिरवी झेंडी दाखविली आहे. तत्पूर्वी सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या पत्रानुसार जिल्हा परिषदेतील काही विभागाने सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. तर आणखी काही विभागाने याद्या प्रसिद्ध केल्याच नाही. असे असले तरी 23 ते दि. 24 जुलै ह्या दोन दिवसात कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या साधारणत: मे महिन्यात दरवर्षी होतात. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉक डाऊन करण्यात आले होते. परिणामी, जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत.

या प्रकारामुळे बहुतांश बदली पात्र कर्मचार्‍यांचा हिरमोड झाला होता. तर विनंती बदल्या सुद्धा झाल्या नाही. असे असताना यंदाही मे महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप पहावयास मिळाला. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लादलेल्या नियमामुळे मे महिन्यातील बदल्यांचे सत्र पूढे ढकलण्यात आले होते.

अशात काही दिवसांपूर्वीच शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्या 30 जुलै पूर्वी करण्याचे निर्देश सीईओंनी दिले आहे.

आजपासून विभागनिहाय बदल्यांचे वेळापत्रक

जिल्हा परिषदेतील छत्रपती शाहू महाराज सभागृहात 23 रोजी पहिल्या दिवशी सकाळी 11 ते 12 वाजता सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग तर दुपारी 12 ते 2 वाजता अर्थ विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालविकास विभाग आणि दुपारी 3 ते 5 वाजता कृषी विभाग,बांधकाम विभाग, लघु सिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, तर दुपारी 5 ते 6 वाजता शिक्षण विभाग ( केवळ विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख) शिक्षक संवर्ग वगळून समुपदेशानाद्वारे बदल्या केल्या जातील. 24 रोजी सकाळी 10 ते 2 वाजता आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जातील.

पंचायत विभागाला आली जाग

जिल्हा परिषद पंचायत विभागाचा उरफाटा कारभार अनेकवेळा समोर आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे बदल्यांबाबतचे पत्र आल्यानंतरही पंचायत विभागाने पावले उचलली नव्हती. आता ग्रामविकास विभागाच्या पत्रानंतर पंचायत विभागाला जाग आली असून, आता सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com