गतिमंद मुलीवर अत्याचार; वृद्धाला मरेपर्यंत जन्मठेप
जळगाव

गतिमंद मुलीवर अत्याचार; वृद्धाला मरेपर्यंत जन्मठेप

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील एका 9 वर्षीय अल्पवयीन गतिमंद बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपी लोटन फकिरा पाटील या वृद्धाला मरेपर्यंत जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.आर.जे.कटारिया यांनी शुक्रवारी सुनावली आहे.

उत्राण येथील अल्पवयीन गतिमंद बालिकेवर 21 एप्रिल 2019 रोजी आरोपी लोटन फकिरा पाटील याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर कासोदा पोलीस ठाण्यात आरोपी लोटन पाटील याच्या विरोधात गु.र.नं. 21 /19, भादंवि कलम 376 (अ, ब), लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 4, 5 (आय), 6 नुसार गुन्हा दाखल केला होता.

आरोपीला त्याच दिवशी उत्राण गावातून पोलिसांनी अटक केली होती. सपोनि सुनील पवार यांनी 24 जून 2019 रोजी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात पीडितेची आई-वडील, पंचपोलीस, वैद्यकीय अधिकारी, डीएनएतज्ज्ञ आदींंची साक्ष नोंदविली होती.

सबळ साक्षींच्या आधारावर न्या.कटारिया यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड. सचिन पाटील यांनी काम पाहिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com