शिवाजीनगर पुलाच्या कामाबाबत नगरसेवकांचे अभियंत्यांना पत्र

शिवाजीनगर पुलाच्या कामाबाबत नगरसेवकांचे अभियंत्यांना पत्र

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शिवाजीनगर पुलाचे कामाची मुदत संपण्यात येत असूनही अद्याप पुलाचे काम मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, तरी

पुलाचे काम लवकर व्हावे असे पत्र नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्यांकडे दिले आहे.

शिवाजीनगर पुलाच्या कामाची मुदत आता अवघ्या काही महिन्यात संपणार असल्याने या पुलाचे काम अद्याप मार्गी लागत नाही, यामुळे शिवाजीनगर वासीयांसह जवळपासच्या नागरिकांची वाहतुकीबाबत गैरसोय होत आहे.

गेल्या दीड ते दोन वर्षापासून पुलाच्या कामास होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. टॉवरकडून रस्त्यावर उभे असलेले इलेक्ट्रीक पोलमुळे अडथळे येत आहेत.

तर शिवाजीनगर कडून किमान 13 पिलर उभे करण्यात येत आहेत. एका पिलरला किमान तीन आठवडे लागतात याप्रमाणे 13 पिलर उभे करायचे आहेत.

हे पिलर केव्हा उभे राहणार, हे काम अतिशय संथपणे सुरू आहे. पुलाचे काम मार्चअखेर पयर्र्त होणार होते. मात्र आजच्या स्थितीत जे काम सुरू आहे ते पाहता हे काम मार्चअखेर पूर्ण होणार नसल्याचे दिसते.

तरी आपण या पत्राची दखल घेत हे काम लवकर व्हावे यासाठी लक्ष द्यावे व हे काम मार्च अखेर पूर्ण होईल का याबाबत स्पष्ट करावे असेही पत्रकाद्वारे नगरसेवक दारकुंडे यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com