२०२४ पूर्वी पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करू-ना.जयंत पाटील

जलसंपदा मंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची आढावा बैठक
२०२४ पूर्वी पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करू-ना.जयंत पाटील

अमळनेर - प्रतिनिधी Amalner

तालूक्याला नवसंजीवनी देणाऱ्या पाडळसरे धरणाचे काम आगामी २०२४ पूर्वी पूर्ण करू व येत्या २ वर्षात कॉंक्रीटीकरणाचे काम बंद पडू देणार नाही एव्हढी निधी देवू असे आश्वासन जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांनी दिले आज दि.११ रोजी त्यांनी पाडळसरे धरणस्थळी भेट दिली.

यावेळी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेवून माहिती घेवून पाहाणी केली ना.पाटील यांनी सांगीतले की पाडळसरे धरणाची व्याप्ती व गरज आज प्रत्येक्ष बघीतली सूचना एैकल्या धरणाचे डिझाईनीगचे काम आयआयटीकडे दिले आहे एक महिन्यात येईल कॉंक्रीटीकरण २ सिजन मध्ये पूर्ण करू गूजराथ कडे जाणारे हक्काचे पाणी कूठे अडविता येईल ते पाहू या धरणाचे भूमिपूजन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले त्यांचेच हस्ते लवकरच  जलपूजन करू येत्या ३ वर्षात धरणाचे काम पूर्ण झाल्याचे दिसेल जिल्ह्यात  नाथा भाऊंचा हात ज्या प्रकल्पाला लागला त्या कामांना भाजपा सरकारने निधी ऊपलब्धच करून दिला नाही अशी टिका केली.

यावेळी आ.अनिल पाटील एकनाथराव खडसे यांनी माजी जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी जिल्हयाच्या या प्रकल्पांकडे दूर्लक्ष केल्याची टिका केली यावेळी चोपड्याचे आ लता सोनवणे अरूण गूजराथी आ अनिल पाटील गफ्फार मलीक माजी आ.मनिष जैन, गूरूमूख जगवानी, तिलोत्तमा पाटील, माजी आ.साहेबराव पाटील, शरद पाटील संजय पवार, पणण संचालक जि.प.सदस्या जयश्री पाटील, पाडळसरे धरण समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ राकॉचे पदाधिकारी उपस्थीत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com