सुनसगाव ता भुसावळ - Bhusawal - वार्ताहर :

येथून जवळच असलेल्या वराडसिम वाघुर धरण परिसरात बिबट्या चे दर्शन घडल्याने शेतकरी व मजूरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वराडसिम वाघुर धरण परिसरात दोन - तीन महिन्यांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली होती . तसेच सुनसगाव परिसरात ही बिबट्या सारख्या वन्यप्राण्यांच्या पायाचे ठसे उमटले होते मात्र ते ठसे तडसा चे असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी लावला होता .

मात्र आज दि १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान कंडारी ( ता.जळगाव ) ते निमगाव ( ता. जळगाव ) या पाटाच्या रस्त्यावर बिबट्या बसलेल्या अवस्थेत ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या मजूरांना दिसला त्यामुळे या बिबट्या चा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या भागात बिबट्या असल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात आहे परंतु बेलव्हाळ येथील लोकांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिला असून या परिसरातील कंडारी , निमगाव ,भागपूर भागातील शेतकरी व मजूरांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे .

या परिसरात जंगल असल्याने तसेच नदीला पाणी असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र आता बिबट्या नर आहे की मादी का आणखी बछेडे आहेत असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मात्र बिबट्या असल्याचे खात्रीलायक माहिती सांगितली जाते आहे.जितेंद्र काटे