सुनसगाव - भुसावळ - वार्ताहर :

येथील शेती शिवारात बिबट्याचे दर्शन घडल्याने रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी शेतातून काढता पाय घेत थेट घराचा रस्ता धरला यामुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील गोजोरा - सुनसगाव रस्त्यावरील तळ्याच्या विहीर जवळील श्री भवानी माता मंदिर परिसरात शेतातच राहणाऱ्या मजूरांना दि ११ रोजी रात्री ९ वाजे दरम्यान बिबट्या वाघ दिसल्याने या मजूरांनी या परिसरात आरडाओरड केली .

त्यामुळे वन्यप्राण्यां पासून पिकाची राखण करण्यासाठी गेलेले शेतकरी घराकडे निघून आले सुनसगाव येथील बसस्थानक चौकात येऊन सर्व शेतकऱ्यांनी गावात बिबट्या असल्याचे सांगितले त्यामुळे गावातील काही तरुण बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी गेल्याचे समजले .

काही दिवसांपूर्वी निमगाव - कंडारी शिवारात बेलव्हाळ येथील लोकांना बिबट्याचे दर्शन घडल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते आता पुन्हा बिबट्या दिसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.