किसान रेल्वे सेवेत लिंबूफळाचा समावेश व्हावा
जळगाव

किसान रेल्वे सेवेत लिंबूफळाचा समावेश व्हावा

चाळीसगावला मिळावा थांबा

Rajendra Patil

रवींद्र पाटील

गुढे, ता.भडगाव

भाजीपाला आणि फळांची वाहतुक करणारी पहिली किसान रेल्वे सेवा महाराष्ट्रातील देवळाली ते दानापूर (बिहार) साप्ताहिक रेल्वे सुरु झाल्यामुळे शेतकर्‍यांनी आनंद समाधान व्यक्त केले असून याच धरतीवर किंवा याच किसान रेल्वेसेवेत लिंबू फळासाठी चाळीसगावात थांबा देऊन लिंबू फळ माल वाहतुक सुरु करावी अशी मागणी चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आदी तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकर्‍यांनी मागणी केली आहे.

या मागणीकडे खा.उन्मेष पाटील यांनी लक्ष घालावे अशी मागणी लिंबू उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे. खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून किसान रेल्वे सुरु करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणा दरम्यान केली होती. नाशिवंत कृषी उत्पादनाच्या वाहतुकीसाठी आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात किसान रेल्वे या शीत रेल्वेगाडीची घोषणा करण्यात आली होती.

या रेल्वे सेवेचा नुकताच 7 ऑगस्टला शुभारंभ करून पहिली किसान रेल्वे सुरु होऊन रवाना झाली आहे. मध्यरेल्वेचा भुसावळ विभागात तापी, गोदावरी, गिरणा, मौसम, मन्याड आदी नदया व मोठ मोठे धरण, कालव्यांमुळे हा भाग सुजलाम, सुफलाम झाला आहे. या नदीच्या खोर्‍यात मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन असल्याने बागायत, फळबागायत, भाजीपाला, फळे, फुले, ही नाशीवंत तर कांदा व इतर कृषी मालाचे उत्पादन होते.

चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, नांदगाव, कन्नड, जळगाव, धुळे आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंबूचे व डांळीब, मोसबी, केळी घेतले उत्पन्न घेतले जाते तसेच येथील लिंबू मुंबई, दिल्ली, नाडीयाद, लुधियाना, लखनऊ, वाराणसी, उत्तर भारतात, कलकत्ता, अमतसर, सिक्कीम आदी ठिकाणी देशभरात मालवहातुक गाडीने पाठवला जातो पण लिंबू हे फळ देखील नाशिवंत फळ आहे म्हणून लांबच्या प्रवासात टिकत नाही म्हणून शेतकर्‍यांना त्यांनी पिकवलेल्या कष्टाच्या माला अपेक्षित भाव मिळत नाही म्हणून शेतकर्‍यांची प्रगतीत मोठा अडथळा निर्माण होत आहे.

यापूर्वी कजगावला केळीचा मालधक्का होता तो बंद झाला आहे म्हणून आता चाळीसगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे किसान रेल्वेला थांबा दिल्यास वरील तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com