विधी मंडळाची अंदाजपत्रक समिती आजपासून जिल्ह्यात

विकासकामांचा घेणार आढावा; मनपासह जिल्हाभरात करणार पाहणी
विधी मंडळाची अंदाजपत्रक समिती आजपासून जिल्ह्यात
USER

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध विभागांकडून गत पाच वर्षात झालेल्या खर्चाचा आणि कामांचा आढावा घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती Legislative Council Budget Committee मंगळवार 24 ऑगस्टपासून तीन दिवस जिल्हादौर्‍यावर येत आहे. या समितीमध्ये 33 आमदारांचा समावेश असून ही समिती महापालिकेसह जिल्हाभरात विकासकामांची पाहणी Inspection of development works करणार आहे.

विविध विभागांकडून गत पाच वर्षात झालेेली कामे, त्यावरील खर्च, प्रकल्पांची सद्यस्थिती यासंदर्भात पाहणी आणि आढावा घेण्यासाठी विधीमंडळाची अंदाज समिती दि. 24 ते 26 या कालावधीत जिल्हा दौर्‍यावर येत आहे.

ही समिती आढावा घेऊन काही प्रकल्पांना भेटी देणार आहे. तसेच या दौर्‍याचा अंतीम अहवाल हा शासनाला सादर केला जाणार आहे. समिती अंदाज समितीचे प्रमुख म्हणून रणजित कांबळे हे असून आमदार चिमणराव पाटील, सदा सरवणकर, संजय गायकवाड, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाठ, प्रकाश सोळंके, मकरंद जाधव-पाटील, दिलीप मोहिते-पाटील, माणिकराव कोकाटे, कुणाल पाटील, अमित झनक, धीरज देशमुख, किसन कथोरे, संभाजी पाटील-निलंगेकर, विकास कुंभारे, राम कदम, मनिषा चौधरी, रवी राणा, कृष्णा खोपडे, प्रकाश आवाडे, रईश शेख, विलास पोतनीस, दुष्यंत चतुर्वेदी, सतीश चव्हाण, डॉ. वजाहत मिर्झा, सुरजितसिंह ठाकुर, निलब नाईक, बळवंत वानखेडे, डॉ. भारती लव्हेकर, कपील पाटील, विनाकराव मेटे, विक्रम काळे यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com