चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील मेहूणबारे पोलीस स्टेशन हद्दीतून पसार झालेला सुमारे ५७ लाख रूपयांचा गुटखा जळगाव येथे १६ ऑक्टोबर रोजी पकडला होता. या गुटख्याप्रकरणी तपासी अधिकारी कैलास गावडे यांनी गुटखा विक्रेता विजय उर्फ बापु चंद्रकांत देवरे याला अटक केली असून त्याने तो जप्त केलेला गुटखा आपलाच असल्याची कबुली दिली आहे.

विजय देवरे यास आज गुरुवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. विजय देवरे पोलिसांच्या हाती लागला आहे. परंतू अद्यापही शहरातील मोठा गुटखा किंग मोकाटच आहे, त्याला अटकेपासून वाचविण्यासाठी राजकिय पुढारी जोरदार प्रयत्न करीत असल्याचा चर्चा शहरात आहे. त्यामुळे पोलिसांनी आता खर्या अर्थाने आपले कर्तत्व बजावत चाळीसगावातील या गुटखा किंगला पकडण्यासाठी मोहिम तेज केली पाहिजे.

विजय देवरे यास आज गुरुवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. विजय देवरे पोलिसांच्या हाती लागला आहे. परंतू अद्यापही शहरातील मोठा गुटखा किंग मोकाटच आहे, त्याला अटकेपासून वाचविण्यासाठी राजकिय पुढारी जोरदार प्रयत्न करीत असल्याचा चर्चा शहरात आहे. त्यामुळे पोलिसांनी आता खर्या अर्थाने आपले कर्तत्व बजावत चाळीसगावातील या गुटखा किंगला पकडण्यासाठी मोहिम तेज केली पाहिजे.

चाळीसगावकडे येणारा लाखो रूपये किंमतीचा गुटख्याचा ट्रक जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीसांनी पकडून तो जळगावकडे येत असतांना असतांनाच काही दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सहकार्यांनी तो जळगावनजीक जैन व्हॉलीजवळ पकडला. मात्र या ट्रकच्या पकडण्यावरून मोठा संशयकल्ल्लोळ निर्माण झाला होता. जळगाव पोलीसंाच्या म्हणण्यानुसार गुटख्याचा ट्रक त्यांनी पकडून कारवाईसाठी जळगाव नेत होते. तर आमदार चव्हाण यांनी हा गुटखा मेहूणबारे पोलीस स्टेशन हद्दीत पकडला असतांना थातूर मातूर कारवाईसाठी जळगावी नेला जात होता असा आरोप करून संबंधीत पोलीस अधिकार्यंाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर स्थानिक गुन्हा शोखेने याबाबत पोलीसात फिर्याद दिली. त्यात ५७ लाख ८६ हजारांच्या गुटख्यासह ९ लाख रूपयांचा ट्रक असा ६६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस नाईक मनोज दुसाने यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तो शून्य नंबरने मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला याप्रकरणी ट्रक चालक मसूद अहमद शब्बीर अहमद (वय ३८) रा. संगमेश्वर, मौलाना इसाक चौक, मालेगाव आणि क्लिनर मोहम्मद अय्युब दिन मोहम्मद (वय ५६ ) रा. दादामिया का तकिया, मालेगाव यांना अटक करण्यात आली होती. त्यंाना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता जामीनावर सुटका करण्यात आली. आता याप्रकरणी तपास चाळीसगाव उपविभागीय अधिकारी कैलास गावडे यांच्याकडे आहे. या गुटख्याच्या तपासादरम्यान त्यांना हा गुटखा चाळीसगाव येथील गुटखा विक्रेता विजय उर्फ बापू चंद्रकांत देवे यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने डीवायएसपी श्री. गावडे यांनी विजय देवरे यास बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता देवरे याने पकडलेला हा गुटखा आपल्याच मालकीचा असल्याची कबुली दिली. गुजरातच्या वापी येथून दोंडाईचा मार्गे गुटखा किंग शंकर खत्री (दोंडाईचा) यांच्या मार्फत चाळीसगावकडे येत होता. असेही देवरे याने सांगितले. त्यामुळे देवरे यास रितसर अटक करण्यात आली. संशयित देवरे यास आज गुरुवारी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली.या गुटख्याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. गुटखा जप्ती प्रकरणी देवरे यास अटक केलेल्या या प्रकरणात आणखी काय धागेदोरे मिळतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागलेले आहे. पोलिसांच्या रडावर असलेला दुसरा गुटखा माफिया हा एक पक्षाचा पदाधिकारी असून त्याला वाचविण्यासाठी काही जण पुढकार घेत असल्याची दबक्या आवाजात पोलीस खात्यात चर्चा आहे.