दैवळाली येथे हिरवा झेंडा दाखवून किसान रेल्वेचा शुभारंभ करताना
दैवळाली येथे हिरवा झेंडा दाखवून किसान रेल्वेचा शुभारंभ करताना|भुसावळ विभाग
जळगाव

देवळाली-दानापुर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ

व्हिडिओ लिंकद्वारे दाखविला हिरवा झेंडा

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - प्रतिनिधी Bhusawal

देळाली -दानापुर किसान पार्सल एक्सप्रेसचा शुभारंभ केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

अध्यक्षस्थानी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषी व किसान कल्याण मंत्री पुरुषोत्तम रुपाला, कैलास चौधरी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे, खा.डॉ.भारती पवार, आ.सरोज अहिरे व्हिडिओ लिंकद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, डिआरएम विवेक कुमार गुप्ता, एडीआरएम मनोज सिन्हा देवळाली स्थानकावर उपस्थित होते. सिनियर डिसीएम युवराज पाटील, वरिष्ट मंडल परिचालन प्रबंधक आर.के. शर्मा यांच्यासह सर्व शाखांचे अधिकारी व्हिडिओ लिंकद्वारे उपस्थित होते .

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com