स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवाचे आज उद्घाटन

स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवाचे आज उद्घाटन

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

परिवर्तन Parivartan व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन Bhavarlal & Kantabai Jain Foundation आयोजित स्व. पृथ्वीराज चव्हाण सांस्कृतिक महोत्सवाची Late. Prithviraj Chavan Cultural Festival सुरवात दि.20 पासून होत आहे. तीन दिवस चालणा-या या महोत्सवाचे उद्घाटन जैन हिल्स येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच साहित्य, चित्र व नाट्य क्षेत्रात अभिनव कार्य केल्याबद्दल सन्मान प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित नाटककार दत्ता पाटील, दुस-या दिवशी मध्यप्रदेश शासनाचा प्रतिष्ठेचा कालिदास पुरस्कार प्राप्त चित्रकार श्याम कुमावत आणि महोत्सवाच्या समारोप प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानीत बाल साहित्यकार आबा महाजन या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, आ. चिमणराव पाटील, आ. राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महोत्सवास प्रारंभ जगप्रसिद्ध लेखिका अमृता प्रितम व गीतकार साहिर लुधियानवी, इमरोज यांच्या प्रेमावर व जिवनावर आधारित शंभू पाटील लिखित अमृता साहिर इमरोज या नाटकाने महोत्सवाची सुरूवात होणार आहे. प्रमुख भूमिका शंभू पाटील व हर्षदा कोल्हटकर यांची असून दिग्दर्शन मंजुषा भिडे यांचे आहे. तर पार्श्वसंगीत राहुल निंबाळकर व तंत्र सहाय्य यांचे आहे.

दि.21 रोजी नाटकघर पुणे निर्मित जेष्ठ नाटककार रामू रामनाथन लिखित व अतुल पेठे दिग्दर्शीत शब्दांची रोजनिशी हेे नाटक सादर होणार आहे. महोत्सवाचा समारोप दि. 22 रोजी कबीर या सांगीतिक कार्यक्रमाने होणार आहे. संत कबीराच्या दोह्याचे सादरीरण सांगितिक पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांनी केले आहे तर संगीत नियोजन मंजुषा भिडे यांचे असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com