प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित

ग्रामविकास मंत्री यांना दिले निवेदन
प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित

गुढे.ता.भडगाव - वार्ताहर - Bhadgaon

राज्यभरातील प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यातील प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांच्या प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्याबाबतचे निवेदन नुकतेच गडहिंग्लज येथे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष भरत जगताप व संंघाचे पदाधिकारी यांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी शिक्षण मंत्री ना.प्रा.वर्षा गायकवाड यांच्या सोबत संयुक्त बैठक घेऊ व आपले प्रलंबित प्रश्न,समस्या सोडवू अशी ग्वाही यावेळी शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की; सहाव्या वेतन आयोगात माध्यमिक व उच्च माध्यमिक कालबद्ध पदोन्नती घेतलेल्या प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांची वेतन निश्चिती वित्त विभागाच्या चुकीच्या शासन निर्णयानुसार लेखाधिकारी कार्यालयाने केली आहे.

याबाबत योग्य शहानिशा शालेय शिक्षण विभागाने करून प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चिती बाबत शासन निर्णय निर्गमित करावा शालेय शिक्षण विभागाने २८ जानेवारी २०१९ रोजी शिक्षकेतर कर्मचारी कपातीचा आकृतीबंध लागू केला आहे. तो रद्द करून २३ आक्टोंबर २०१४ चा आकृतिबंध यावर अभ्यास करण्यासाठी शालेय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सुचविलेला शिक्षकेतर कर्मचारी आकृतिबंध प्रस्ताव मान्य करावा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा परिचर पदाला इतर विभागाप्रमाणे वर्ग-३ चा दर्जा देऊन राज्यातील रिक्त प्रयोगशाळा सहाय्यक पदी प्राधान्याने पदोन्नती द्यावी.

मुंबई उच्च न्यायालयाने प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांची वेतन श्रेणी याचिका ६०२८/ २०१४ बाबत दिलेल्या १६ नोव्हेबर २०१९ च्या निर्णयानुसार व शालेय सचिव यांच्या दालनात झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने १५ जुलै रोजी दिलेल्या निर्णयानुसार प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचर यांच्या वेतनश्रेणीचा प्रस्ताव वित्त विभागाकडील निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार कालमर्यादेत घ्यावी व त्याची प्रत राज्य महासंघाला मिळावी.राज्य शासकीय कर्मचारी प्रमाणे नवीन तीन लाखांची सुधारित अश्वाशीत प्रगती योजना शालेय शिक्षण विभागाने प्रयोगशाळा कर्मचारी यांना लागू करावी. या मागण्या मान्य कराव्यात.असेही निवेदनात म्हटले आहे.

या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचेशी चर्चा करून महासंघाच्या पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊ असे अश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

यावेळी राज्य अध्यक्ष भरत जगताप,जिल्हा अध्यक्ष जगदीश शिर्के,सचिव अशोक आरेकर, के.डी.पोवार, डी.के.पाटील, विश्वनाथ पाटील, संजय पाटील, रावसाहेब वडर उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com