गिरणा नदीवरील केटीवेअर "ओव्हरफ्लो"

गुढे परिसरात होत असलेल्या चांगल्या पावसाचा परिणाम

रविंद्र पाटील

गुढे.ता.भडगाव -

गेल्या दहा दिवसापासून गुढे परिसरात चांगला पाऊस झाल्याने परिसरातील छोटे-मोठे,नदी नाले-ओढे खळखळून वाहत असल्याने पावसाचे पाणी गिरणा नदीत येत असल्याने ती प्रवाहीत झाल्याने सावदे गावालगतच असलेला गिरणा नदीवरील केटीवेअर आठवडाभरापासून वाहू लागला असून आता तो ओसाडून वाहून लागला आहे तो "ओव्हरफ्लो"होऊन खळखळून वाहत असल्याने पोहणाऱ्यांची बघ्यांची चांगली गर्दी संख्या दिसून येत आहे.

गेल्या दहा दिवसापासून गुढे गाव परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतशिवार ओलाचिंब झाल्याने शेतजमिनीची तहान भागल्याने शेतातील जास्तीचे पाणी शिवारातून वाहत असल्याने शिवारातील छोटे मोठे नाले खळखळून वाहून शिवारातील छोटे मोठे माती, सिंमेट, दगडी बांध फुल्ल झाल्याने तेही प्रवाहीत होऊन गाव शिवारातून वाहत येऊन नदीला मिळत असल्याने नदी देखील वाहत असून या नदीवर सावदे गांवा जवळील बंधारा ओव्हरफ्लो होऊन ओसाडून वाहत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com