Khamgaon
Khamgaon
जळगाव

खामगाव : शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणलेले अर्भक निघाले बाहुले

पोलिसही चक्रावले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

खामगाव - Khamgaon

सद्यस्थितीत संपूर्ण जग हे कोरोना महामारी चा सामना करीत असताना जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलीस प्रशासनासाठी कालचा आणि आजचा दिवस डोकेदुखी ठरला आहे. बोरजवळा ता.खामगाव येथील धरणामध्ये नवजात अर्भक असल्याची माहिती काल रात्री ९ वाजेच्या दरम्यान मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची बारकाईने पाहणी करीत आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत त्या मृत अर्भकाला धरणातून बाहेर काढले.

सदर अर्भक हे कुजलेल्या अवस्थेत असल्याने व धरण परिसरात रात्रीचा काळाकुट्ट अंधार असल्याने या प्रकरणी परिस्थिती नेमकी काय आहे हे तात्काळ समजणे गैर असल्याने पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ते अर्भक रात्रीं १२ च्या दरम्यान सामान्य रुग्णालय खामगाव येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केले.

रात्रभर पोलीसानी त्या मृत अर्भकाच्या प्रकरणी तापसकामी राबवून आपले कर्तव्य पार पाडले.त्यामुळे सदर बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने तर्कवितर्क लावण्यात येत असतानाच हे मृत अर्भक अनैतिक संबंधातून फेकल्या गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती.

मात्र आज सकाळी सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जेव्हा त्या मृत अर्भकाचे शवविच्छेदन सुरू केले तेव्हा त्या मृत अर्भकाच्या हातातून व पायातून स्पंच निघाल्याने वैद्यकीय अधिकारी सुद्धा चक्राकून गेले.त्यामुळे ते मृत अर्भक नसून एक बाहूला असल्याचे समोर आले आहे.या प्रकारामुळे पिंपळगाव राजा परिसरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती.त्यामुळे आज सकाळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती देत झालेल्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती देत ते अर्भक नसून बाहुला असल्याचे सांगितले.

त्यामुळे पोलीस प्रशासनाने व आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला.या प्रकारामुळे परिसरात अनैतिक संबंधातून हे अर्भक फेकून दिल्याची जोरदार चर्चा सुरू होती.या ठिकाणी ठाणेदार सचिन चव्हाण, रायटर संतोष डागोर,पोकॉ विजय पढार,विनोद भोजने यांच्यासह सहकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

अनैतिक संबंधाच्या चर्चेला आला होता उत

या प्रकरनाची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत असतानाच सदर घटना ही अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली होती.यामुळे क्रूरपणे प्रकार करणारा कायद्याच्या कचाटीतून सुटू नये अशी मागणी वा चर्चा नागरिक करीत होते.

कोरोना योद्धा म्हणून सेवा देणाऱ्या पोलिसांना त्रास

घटनेची चुणूक लागताच गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या पोलिस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी दाखल व्हावे लागले.त्यामुळे कोरोनाच्या काळात कर्तव्य पार पडणाऱ्या पोलिसांना या घटनेमुळे मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे एकंदरीतच हा प्रकार म्हणजे खोडसाळ पणाचे लक्षन असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे त्यादृष्टीने ठाणेदार सचिन चव्हाण हे तपास करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच मी माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.रात्रीची वेळ असल्याने मृतक नवजात अर्भकच दिसत असल्याने आम्ही पंचनामा करून ते अर्भक सामान्य रुग्णालयात हलविले.आज शवविच्छेदन अहवाल येताच ते अर्भक नसून बाहुला असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.यामुळे आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सचिन चव्हाण - सहाय्यक पोलीस निरीक्षक,पिंपळगाव राजा पोलिस ठाणे

Deshdoot
www.deshdoot.com