जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शहरातील शिवराम नगर येथील निवास्थानावरून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

भोसरीतील भूखंड व्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावल्याने ते येत्या बुधवारी मुंबईत चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबईला जाण्यापूर्वी ते नाशिकला निकटवर्तीयांच्या लग्नसमारंभाला उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक येथून ते थेट मुंबईला जाण्याची शक्यता आहे.

एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या व्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यानुसार खडसेंना बुधवारी 30 डिसेंबर मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.

खडसे काल शनिवारी सायंकाळी मुक्ताईनगर येथून जळगावात आपल्या मुक्ताई निवासस्थानी आलेले होते. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ते कुटुंबीयांसह वाहनांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईला आपण 30 रोजी पोहचणार आहोत, आधी एका लग्न समारंभाला जात असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.