कन्नट घाट ११ रोजी रहदारीसाठी बंद

प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांची माहिती
कन्नट घाट ११ रोजी रहदारीसाठी बंद

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ या महामार्गावर चाळीसगाव कन्नड (औट्रम) घाटातील साखळी क्र. ३७९.७६० ते ३८८.००० मधील रस्त्यावर खड्डे पडलेले असुन वाहतुक कोंडी व अपघात होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजविणे/दुरुस्तीचे काम रविवार, दि. ११ ऑक्टोंबर, २०२० रोजी हाती घेण्यात येणार असल्याने एका दिवसासाठी सदरील रस्त्यावरील वाहतुक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे.

या काळात सर्व प्रकारच्या वाहनासाठी वळणमार्ग असा आहे-

धुळेकडून औरंगाबादकडे येणारी वाहतुक ही धुळे मालेगांव- नांदगांव- शिउर बंगला- देवगांव रंगारी मार्गे औरंगाबाद, चाळीसगावकडून औरंगाबादकडे येणारी वाहतुक ही चाळीसगाव - नांदगांव- शिउर बंगला- देवगांव रंगारी मार्गे औरंगाबाद, औरंगाबाद कडून चाळीसगाव व धुळे कडे जाणारी वाहतुक ही औरंगाबाद देवगांव रंगारी- शिउर बंगला- नांदगांव मार्गे चाळीसागांव व धुळे कडे जातील. अशी माहिती प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com