<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p> ओबीसी नेता श्रावण देवरे याने मराठा आरक्षणाला प्रखर विरोध करत, मराठ्यांना ओबीसी मधूनतर नाहीच, मात्र सरकारने ईएसबीसीच्या फेकलेल्या तुकड्यातले कवडी ऐवढे आरक्षण सवलती सुध्दा मराठ्यांच्या पदरात पडु देणार नसल्याची भाषा वापरत, राजर्षी शाहु महाराज, सयाजीराव गायकवाड, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील, आण्णासाहेब पाटील या महापुरुष व बहुजन समाजात स्थान असणार्या महान व्यक्ती विषयी खालच्या भाषेत व्यक्तव्य करून अवमान केला. </p>.<p>याच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे आज ओबीसी नेता श्रावण देवरेच्या प्रतिकात्मक फोटोला चाळीसगाव तहसील कार्यालया समोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी श्रावण देवरेच्या विरोधात दिलेल्या घोषणानी परीसर दणादणला होता.</p>