रा.कॉं.महिला आघाडीतर्फे प्रविण दरेकरांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जळगावात आंदोलन
रा.कॉं.महिला आघाडीतर्फे प्रविण दरेकरांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

जळगाव - jalgaon

भाजपचे (BJP) विधान परिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर (Leader of Opposition Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तसेच महिलांबद्दल अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे (Nationalist Congress Women's Front) जळगाव शहरातील शिवाजी पुतळ्यासमोर दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेता भाजप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे. अशाप्रकारे पक्षाचा तसेच महिलांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून जळगाव राष्ट्रवादी कॉग्रेंस महिला आघाडीतर्फे शिवाजी पुतळ्यासमोर दरेकरांच्या फोटोवर शाई फेकुन तसेच जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

यांचा होता आंदोलनात सहभाग

प्रवीण दरेकर मुर्दाबाद, भाजपचा निषेध असो, दरेकरांचा निषेध असो, महिलांचा अपमान करणार्यांचा निषेध असो, दरेकरांचे करायचे काय, खाली डोक वरती पाय अशा पध्दतीने जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महानगराध्यक्ष मंगला पाटील यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष कल्पना अहिरे, मिनाक्षी चव्हाण, निरिक्षक शालीनी सोनवणे, कार्याध्यक्ष आशा येवले, सुमन बनसोडे, दिपीका भामरे, मिनाक्षी शेजवळ, पिनाज फनीफंदा, ॲड.निशा निंबाळकर, निलाक्षी साठे यांचा सहभाग होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com