मनपा आयुक्तपदी डॉ.माधवी खोडे चवरे यांची नियुक्ती
जळगाव

मनपा आयुक्तपदी डॉ.माधवी खोडे चवरे यांची नियुक्ती

Balvant Gaikwad

17 रोजी स्विकारणार पदभार

शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागी नागपूर येथील वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालक डॉ. माधवी खोडे चवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवारी राज्य शासनाने राज्यातील चार आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. जळगाव शहर मनपाच्या आयुक्तपदी प्रथमच महिला अधिकारी नियुक्त झाल्या आहेत. त्या 2007 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

त्यांचे शालेय शिक्षण यवतमाळ येथे झाले असून गोल्ड मेडलिस्ट देखील आहेत.त्यांनी विविध पदांवर काम करतांना बजावलेल्या विशेष सेवांबद्दल त्यांना अनेक प्रतिष्टीत पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले आहे.

त्या सोमवार 17 रोजी मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार आहेत. सध्या महापालीकेच्या आयुक्त पदाचा पदभार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com