मनपाच्या 1141 कोटींच्या अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सादर
जळगाव

मनपाच्या 1141 कोटींच्या अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सादर

Balvant Gaikwad

जळगाव –
मनपात प्रभारी आयुक्त ढाकणे यांच्या उपस्थितीत मनपाचा 1141 कोटीचा अर्थसंकल्प मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांनी काल स्थायी समितीत मांडला. यावर चर्चा न होता फक्त वाचन जिल्हाधिकार्‍यांनी केले व 5 मिनिटातच सभा आटोपती घेतली. यावेळी व्यासपीठावर स्थायी सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. आयुक्तांची सही असलेला हा अर्थसंकल्पाचा प्रस्ताव मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांनी स्थायीसमोर सादर केला. यावर स्थायी समितीत अभ्यास केला जाईल. त्यानंतर महासभेत यावर मंजूरी घेतली जाणार आहे.

डेली वसुलीच्या दरात वाढ

बाजारातील हॉकर्स यांना आतापर्यंत 20 रुपये पावती प्रमाणे आकारले जात होते. त्यात 30 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेवून पावतीचा दर 20 रुपये ऐवजी 50 रुपये प्रस्तावित आहे. बाकी कुठलाच बदल केला नसल्याचे या अर्थसंकल्पावरुन दिसून येत आहे. हा प्रस्ताव 168 कोटी शिलकीचा आहे. मनपा निधी 90.61 कोटी व शासकीय निधी 377.27 कोटी मिळून अंदाजपक 1141.96 कोटी इतके प्रस्तावित आहे. यावर अभ्यास करुन ठोस निर्णय स्थायीत सभापतींच्या अध्यक्षतेखाली घेतला जाईल त्यानंतर महासभेत हा ठराव मंजूर केला जाणार आहे.

जमा लेखाशीर्ष(लाखात)

स्थानिक संस्थाकर 4.00, जमीनीवरील कर 2930.22, इमारतीवरील कर 5327.06, वृक्ष कर 129.21, जाहिरात कर 50, महाराष्ट्र शि. व रो. ह. कर रिबेट 15, नगररचना 938.98, वैद्यकीय सेवा 21.00, बाजार कत्तलखाने व इतर 350.46, मनपा मिळकतींपासून उत्पन्न 25645.65, किरकोळ उत्पन्न 254.92, अनुदाने 9182.88 असाधारण जमा 3324.19, परिवहन स्वामित्व धन व उत्पन्न 3.8, पाणीपुरवठा कर 5842.47, मल नि:सारण कर 504.58, आरंभीची शिल्लक 12882.76, विविध मनपा निधी 9061.85, वि. शा. निधी व कुल एकूण 37727.54. असे एकूण 114196.57.

खर्च लेखाशीर्ष(लाखात)

सामान्य प्रशासन 4596.57, सार्व. सुरक्षितता 2403.98, सार्व. आरोग्य व सुखसोई 10448.09, सार्व. शिक्षण 1549.36, इतर किरकोळ 26.00, थकीत देणी 10801.00, भांडवली खर्च (मनपा निधीतून) 15191.83, देवघेव 2113.00, पाणी पुरवठा 3398.24, परिवहन खर्च 3.80, मनपा निधी 9061.85, वि. शा. निधी व कुल एकूण 37727.54, अखेर शिल्लक 16875.31 असे एकूण 114196.57. अशा प्रकारचा अर्थसंकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात आला असून यावर लवकरच मंजूरी घेण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com