जितेंद्र कंडारेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

बीएचआर घोटाळा, चौकशीत अनेक बाबी समोर येण्याची शक्यता
जितेंद्र कंडारेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

जळगाव - Jalgaon

बीएचआर (BHR) घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Crimes Branch) अटक केलेल्या जितेंद्र कंडारे याची तीन दिवसांची पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Thane) बीएचआर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहेत. या गुन्ह्यात सात महिन्यानंतर फरार असलेल्या मुख्य संशयित जितेंद्र कंडारेच्या पुणे आर्थिक शाखेच्या पथकाने इंदोरमधून मुसक्या आवळल्या. त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान पोलीस कोठडीत त्याच्याकडून गुन्हयासंदर्भातील माहिती तसेच कागदपत्रे संकलित करण्याचे काम पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहेत. संशयित जितेंद्र कंडारे याला सोबत घेत दोन पोलीस निरिक्षक व सहा कर्मचारी अशा आठ जणांचे पथक सोमवारी जळगावात दाखल झाले होते. यादरम्यान एमआयडीसीतील बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात तळमजल्यावर लपविलेल्या २५ फाईल्स हस्तगत करण्यात आहेत. आज कंडारेच्या पोलीस कोठडीची मुुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास आणखी तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील यांनी काम पाहिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com