चाळीसगाव : नाले सफाईसाठी होत नसल्याने नगरपरिषदेला जेसीबी भेट!

जेसीबी मिळत नसल्याने समाजसेवकांनी वाढदिवसांनिमित्त दिली अनोखी भेट, पावसाळा तोंडावर तरी नाले सफाई होईना
चाळीसगाव : नाले सफाईसाठी होत नसल्याने नगरपरिषदेला जेसीबी भेट!

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

पावसाळा तोंडावर आला आहे, परंतू तरी देखील चाळीसगाव नगर परिषदेला नालेसफाई करण्यासाठी जाग आलेली दिसत नाही, वारंवार तक्रार करुनही शहरातील नालेसफाई होत नसल्यामुळे समाजसेवक विजय शर्मा व खुशाल पाटील यांनी स्वता; नाल्यात उतरुन नाले सफाईस सुरुवात केली होती. तरी देखील अजुनही न.पा.प्रशासन जेसीबी मिळत नसल्याने नालेसफाई होत नसल्याचेे सांगत असून नालेसफाईबाबत चालढकल करीत आहे. त्यामुळे आज समाजसेवक विजय शर्मा व कुशाल पाटील यांनी नगरपरिषदेत जावून खेळण्याचे जेसीबी उपमुख्याधिकारी यांना भेट देवून पुन्हा एकदा नालेसाफाईबाबत विनंती केली आहे.

चाळीसगाव : नाले सफाईसाठी होत नसल्याने नगरपरिषदेला जेसीबी भेट!
...तर तुम्हाला टोल भरावा लागणार नाही

यावेळी समाजसेवक विजय शर्मा यांना नालेसफाई बाबत देशदूत वेळोवेळी प्रकाशीत केलेल्या वृत्ताचे अंक देखील नगरपरिषदेत झळकवले. न.पा.च्या प्रशासनाल अचानक खेळण्याचे जेसीबी भेट दिल्यामुळे एकच खळबळ उडाली. समाजसेवक विजय शर्मा यांनी आपल्या वाढदिवानिमित्ताने खेळण्याचे जेसीबी भेट दिल्यामुळे न.पा.प्रशसनाला चांगलीच चपराक बसली असून आता तरी नालेसफाईला न.पा.प्रशासन तातडीने सुरुवात करेल का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच शहरातील राजकिय पुढकारी कुठल्या विकास कामांमद्ये गुंतले हे देखील पाहणे गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com