आठवडाभराच्या जनता कर्फ्यूचा उडाला फज्जा
जळगाव

आठवडाभराच्या जनता कर्फ्यूचा उडाला फज्जा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगांव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हाधिकार्‍यांनी 20 ते 26 जुलैपयर्र्ंत शहरातील वेगवेगळ्या प्रभागांचे 6 झोन करुन त्याद्वारे मनपाने लक्ष केंद्रीत करावयाचे आहे असे ठरविल्याने या आठवडाभर वेगवेगळ्या भागात लागू केलेल्या स्वयंचलित जनता कर्फ्यूला तुरळक प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला आहे. खरे तर जनता कर्फ्यूचा फज्जाच उडााल्याचे स्पष्ट दिसत होते.

वेगवेगळ्या प्रभागात 20 जुलै पासून जनता कर्फ्यू लादण्याचा निर्णय घेतला होता. या भागात अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दवाखाने, बँका वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. प्रारंभीच्या शिवाजीनगर, दूध फेडरेशन, वाल्मिक नगर, रेल्वे पट्टाडील भाग, रथ चौकामागील भाग या प्रभागात बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाला.

त्यानंतर मात्र दि. 21 रोजी प्रभाग 4, 5, 6 मध्ये जनता कर्फ्यूला तुरळक प्रतिसाद मिळाला. हा वर्दळीचा व महत्वपूर्ण केंद्रस्थाने असलेला प्रभाग असल्याने या ठिकाणी शहर परिसरातील नागरिक व्यवसाय कामानिमित्त येत असतात. त्यामुळे पूर्णपणे बंद असलेला जनता कर्फ्यू येथे पाळणे शक्यच नाही. त्यामुळे संमिश्र असा प्रतिसाद या 4, 5, 6 मध्ये या जनता कर्फ्यूला मिळाला. शहरातील टॉवर चौक, कोर्ट चौक, बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसर तसेच जुने जळगाव, बळीराम पेठ, घाणेकर चौक, महानगरपालिका बिल्डींग परिसर, नेहरु चौक, सुभाष चौक, बोहरी गल्ली, जुने जळगाव आदी वर्दळीचे भाग असल्याने जनता कर्फ्यूला नागरिकांकडून ंसंमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

त्यानंतर मात्र तिसर्‍या दिवसापासून आयोजित स्वयंपूर्ण जनता कर्फ्यूचा पूर्णपणे फज्जाच उडाल्याचे चित्र त्या त्या प्रभागातून फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.आठवडाभर असा होता जनता कफ्यूर्ंप्रभाग क्र. 1, 2, 3 हे सोमवारी 20 रोजी बंद, तर प्रभाग क्र. 4, 5,6 हे 21 मंगळवार रोजी तर प्रभाग क्र. 7, 8, 9 हे 22 रोजी बुधवारी, प्रभाग क्र. 10, 11, 12 हे 23 रोजी गुरुवारी, प्रभाग क्र. 13, 14, 15 हे 24 रोजी शुक्रवारी तर प्रभाग क्र. 16 व 17 हे 25 रोजी शनिवारी, तर प्रभाग 18 व 19 हे 26 रोजी रविवारी बंद. या कर्फ्यूदरम्यान मात्र अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, शासकीय कार्यालये, लॅब, बँका यांना वगळण्यात आले असल्याचे आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी पत्रकात म्हटले होते.

Deshdoot
www.deshdoot.com