जामनेर : महाविद्यालयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर - Jamner - प्रतिनिधी :

शहरातील जळगाव रोडवरील डांगी फार्म मध्ये राहणाऱ्या जयेश तुकाराम हिवराळे राहणार मोहाडी हल्ली मुक्काम जामनेर,

या अकरावीत शिकणाऱ्या महाविद्यालय मुलाने आत्महत्या केल्याची घटना बुधवार रोजी दुपारी घडली आहे.

मोहाडी येथील कुटुंब जामनेर येथे फार्म याठिकाणी राहत असून सर्व कुटुंब हे शेतकरी आहे त्यामुळे दिनांक 20 रोजी घरातील सर्व सदस्य शेतामध्ये काम आले गेल्यानंतर जयेश तुकाराम हिवराळे या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या घरातील छताला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली .

या बाबतआत्महत्या का केली असावी याचं कारण मात्र स्पष्ट झाले नसून जामनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर मयत जयेश हिवराळे यांच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com