अटकेतील आरोपीसह बाजार पेठ पोलिस
अटकेतील आरोपीसह बाजार पेठ पोलिस|भुसावळ
जळगाव

जबरी चोरीतील आरोपी गजाआड

भुसावळ बाजार पेठ पोलिसांची कारवाई : साडे अकरा लाखांची चोरी प्रकरण

Ashish Patil

Ashish Patil

भुसावळ - प्रनिधी Bhusawal

जामनेर शहरातील गिरीजा कॉलनी भागात अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी करुन साडेे अकरा लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी येथील बाजारपेठ पोलिसांनी तपासचक्रे ङ्गिरवत आरोपीस दि.६रोजी ताब्यात घेतले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन, जामनेर शहरातील गिरीजा कॉलनी भागातील रहिवासी बळीराम जयराम माळी (वय ७५) यांच्या घरात जबरी चोरी करुन अज्ञात चोरट्यांने ११ लाख ४४ हजार ५६२ रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना दि.८ मे रोजी घडली होती. याबाबत जामनेर पोलिसात गु.र.नं. १४२/२०, भा.दं.वि.३८०, ३९२ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जामनेर पो.स्टे.चे स.पो.नि धरमसिंग सुंदरडे यांनी तपासा सुरु केला होता.त्यातील ङ्गरार आरोपी जितेंद्र ऊर्फ (जितु) किसन गोडले (वय- २७, रा.जामनेर रोड वाल्मीक नगर,भुसावळ) याचा तपास करण्याचे आवाहन सोपनि सुंदरडे यांनी केले होते.

त्यानुसार बाजारपेठचे पो.नि. दिलीप भागवत यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी शहरातील टिंबर मार्केट परीसरातुन सदर आरोपीतास ताब्यात घेवुन बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणून पो.नि. भागवत सर यांच्या आदेशाने जामनेर पो.स्टे चे स.पो.नि धरमसिंग वि.सुंदरडे व पो.कॉ अमोल घुगे यांना पुढील कारवाई साठी यांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके, डिवायएसपी गजानन राठोड पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना रविंद्र बिर्‍हाडे, रमन सुरळकर, महेश चौधरी, पो.कॉ कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी यांनी केली

आरोपी रेकॉर्डवरील

आरोपी जितेंद्र ऊर्फ (जितु) किसन गोडले हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याच्या विरुद्ध भुसावळ बाजार पेठ पो.स्टे, लोहमार्ग पो.स्टे., सावदा पो.स्टे, जामनेर पो.स्टे मध्ये मालाविरुध्द व शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com