पदोन्नत्यांवरुन प्रशासनाला धरले धारेवर

जि.प. स्थायी समितीच्या सभेत सदस्य आक्रमक
पदोन्नत्यांवरुन प्रशासनाला धरले धारेवर
जळगाव जि.पJalgaon ZP

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचारी कोरोना काळात रात्रंदिवस काम करीत आहे. मात्र त्याच कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्या वर्षानुवर्ष रखडल्या आहे.

पदोन्नत्यांवर आज जि.पच्या स्थायी समितीत जि.प सदस्य मधुकर काटे,नानाभाऊ महाजन यांच्यासह सदस्यांनी आवाज उठवित प्रशासनाला जाब विचारला.आरोग्य विभागातील तीन कर्मचार्‍यांच्या दिरंगाईमुळे पदोन्नत्या व कालबध्द रखडल्या असल्याचा सुर सभेत उमटले. तीन्ही कर्मचारी आता रडावर आले असुन येत्या 15 दिवसात पदोन्नत्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

जि.पच्या स्थायी समितीची सभा आज दि.11 रोजी ऑनलाईन पध्दतीने झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प अध्यक्षा रंजना पाटील,सर्व सभापती,अधिकारी उपस्थित होते. या सभेत आरोग्य व ग्रामपंचायत विभागाच्या पदोन्नत्यांवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.तसेच कोविड काळात अनेक अस्थायी आरोग्य कर्मचारी देखील दगावले आहे.त्यांचा लाभ आरोग्य विभागाच्या दिरंगाई मुळे मिळत नसल्याचा संताप सदस्यांनी व्यक्त केला.

आरोग्य विभागाच्या पदोन्नत्यांवर जि.प सदस्य मधुकर काटे,नानाभाऊ महाजन,अमित देशमुख यांनी जाब विचारल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे.त्यातच जे कर्मचारी या टेबलवर आहे ते दिरंगाई करत आहे. दिरंगाई करणारे तीन कर्मचारी आधी काढा,नविन कर्मचारी द्या अशीे अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या तीन ही कर्मचार्‍यांवर कारवाईचे संकेत सभेत देण्यात आले आहे.

समिती नेमली जाणार

आरोग्य विभागाच्या पदोन्नत्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाला कमेटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे.त्यामुळे पदोन्नती व कालबध्द याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. फाईलींचा निपटारा न करणार्‍यांची उचलबांगडी करण्याची मागणी काही सदस्यांनी केली आहे. तसेच मेडीकल बिले देखील तात्काळ अदा करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहे.

ग्रा.प विभागात देखील पदोन्नत्या

ग्रांप विभागा मार्फत ग्रामसेवकांच्या देखील पदोन्नत्या होणार असुन बिंदु नामावली मंजुर झाली असल्याने या पदोन्नत्यांचा देखील प्रश्न मार्गी लागणार असल्याचे स्थायी समितीत ग्रा.प विभागाचे बि.ए.बोटे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com