जि.प.च्या 11 विभागप्रमुखांच्या लेखी खुलाश्यात दडलंय काय ?

सर्व विभाग प्रमुखांनी सादर केला खुलासा; बंद पाकिटाची उत्सुकता
जि.प.च्या 11 विभागप्रमुखांच्या लेखी खुलाश्यात दडलंय काय ?
जळगाव जि.प

जळगाव - Jalgaon :

अभिकरण शुल्काची माहिती जमा न करताच जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांनी तसाच ठराव सभेत मंजुरीसाठी आल्याने 19 एप्रिल रोजी झालेल्या सभेत विरोधी गटाच्या सदस्यांनी सभात्याग केला होता.

त्यावरुन जि.प.च्या संबंधित 11 विभागप्रमुखांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी नोटीस बजावून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार 11 विभागप्रमुखांचे लेखी खुलासे पाकीट बंदात बुधवारी सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाले असून दोन दिवसात सीईओंकडे रवाना होणार असल्याची माहिती जि.प.सूत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात अभिकरण शुल्काचा उल्लेख आला पाहिजे. मात्र, या शुल्काचा कुठेही उल्लेख नसल्याने विरोधी पक्षातील सदस्यांनी 22 मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत हा विषय लक्षात आणून दिला होता.

त्यावर विभागप्रमुखांना पत्र देवून ही माहिती जमा करण्याच्या सूचना देवूनही त्याची अंमलबजावणी न तसाच इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय 19 एप्रिल रोजी झालेल्या ऑनलाईन सभेत ठेवण्यात आला होता.

त्यावरुन विरोधकांनी सभात्याग केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल सीईओ डॉ. बी.एन.पाटील यांनी घेवून जि.प.च्या विविध विभागातील 11 विभागप्रमुखांना नोटीस बजावून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार सोमवारी काहींनी तर काहींनी बुधवारी लेखी खुलासा सादर केला असून आता सर्वच्या सर्व 11 विभागप्रमुखांनी लेखी खुलासा जि.प.सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाले असून ते खुलासे बंद पाकिटात असल्याने कोणत्या विभागप्रमुखांनी काय खुलासा सादर केला.

त्यात समोयचित आणि समाधानकारक उत्तर आहे का? 11 विभागप्रमुखांनी ‘त्या’खुलाश्याच्या अंतरंगात दडलंय काय? अशी उत्सुका लागून आहे.

सर्व विभागप्रमुखांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 28 रोजी सर्व विभागप्रमुखांचे लेखी खुलासा सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाले असून दोन दिवसात ते सीईओंकडे रवाना होणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडून केली जाईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com