जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे गट विमा योजना संपुष्टात येणार

यावर्षी 199 प्रस्तावांना मंजुरी; मयत 22 कर्मचार्‍यांच्या वारसांना 66 लाखांची रक्कम मिळणार
जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे गट विमा योजना संपुष्टात येणार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कालावधित राजीनामा, सेवानिवृत, सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे गट विमा योजनेचे सभासदस्यत्व संपुष्टात येणार आहे.

यावर्षी एकूण 199 प्रस्ताव आले आहेत. त्यात मयत 22 कर्मचार्‍यांचे प्रस्ताव असून त्यांच्या वारसांना 66 लाख 43 हजार 622 रु. प्रदान करण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणार्‍या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना देय होणार्‍या बचत निधीचे लाभ प्रदान करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.

शासन निर्णयान्वये वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी गट विमा 1982 अंतर्गत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कालावधित गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणार्‍या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना मिळणार्‍या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्के निर्गमित केलेले आहेत.

त्यास अनुसरुन सन 2021 या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणार्‍या आणि आलेल्या जि.प. कर्मचार्‍यांना मिळणार्‍या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय निर्गमित करणे आवश्यक आहे.

जि.प.मुख्यकार्यकारी यांनी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कालावधित राजीनामा, सेवानिवृत, सेवेत असताना मृत्यू पावल्याने व इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे गट विमा योजनेचे सभासदस्यत्व संपुष्टात येईल.

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रक्कमेवर 1 जानेवारी 2021 पासून दरसाल दरशेकडा 7.1 टक्के दराने व्याज आकारण्यात आले आहे.

जि.प.कर्मचारी गट विमा योजना 1990 च्या विमा निधीमधील संचित रक्कमांवर दरसाल दर शेकडा 4 टक्के या दराने कोणताही बदल झाला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रक्कमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी, शासन निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 च्या 248 व्या पत्रानुसार तसेच शासनाला समर्थन करणार्‍या अन्य अधिकाराचा वापर करण्याचे आदेश सहाय्यक संचालक लेखा व कोषागारे मुंबई यांनी दिले आहे.

यावर्षी 177 प्रस्ताव आलेले असून त्यांना 96 लाख 77 हजार 47 रु तर मयत कर्मचार्‍यांचे 22 प्रस्ताव असून त्यांच्या वारसांना 66लाख 43 हजार 622 रु.निधी प्रदान करण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com