जिल्हा परिषद 18 गाळेप्रकरणी वादीचा अंतरीम स्थगिती अर्ज फेटाळला

जिल्हा परिषद 18 गाळेप्रकरणी वादीचा अंतरीम स्थगिती अर्ज फेटाळला

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील पुष्पलता बेंडाळे चौक येथील अल्पबचत भवनात जिल्हा परिषद मालकीच्या असलेल्या 18 गाळेधारकांनी न्यायालयीन अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद होऊन आज न्या. जोशी यांनी वादीचा अंतरीम अर्ज फेटाळून लावला.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 20 पैकी 18 गाळेधारकांनी भाडे दिलेले नाही आणि जिल्हा परिषदेला ताबाही देत नाही. याप्रकरणी थकीत वसुली न भरल्यास गाळे खाली करुन ताब्यात घेण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीसा बजावल्या होत्या.

मात्र, वादी नथ्यू महाजन यांच्यासह 18 गाळेधारकांनी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायालयीन अवमान केल्याप्रकरणी जि.प.अध्यक्षा, सीईओ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना वकीलामार्फत नोटीस देवून याचिका दाखल केली होती.

त्यावर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. हरुल देवरे यांनी तर वादीतर्फे अ‍ॅड. एस.बी अग्रवाल यांनी युक्तीवाद केला.

दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद ऐकल्यानंतर वादीचा अंतरीम स्थगिती अर्ज न्या. जोशी यांनी आज फेटाळून लावला.सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. हरुल देवरे यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com