जळगावच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

वाकड पोलिसात पतीसह ४ जणांविरुद्ध गुन्हा
जळगावच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon :

शहरातील सागर पार्क येथील माहेर असलेल्या सागर किरण पाटील वय ३६ रा.पुनावळे, पुणे या विवाहितेने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने पुण्यात ईमारतीहुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना ७ जुलै रोजी घडली होती.

याप्रकरणी बुधवार १४ जुलै रोजी पतीसह सासरच्या चार जणांच्या विरोधात पुण्यातील वाकड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मयत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन असे की, विवाहिता किरण पाटील हिचा लग्नानंतर पुण्यातील पुनावळे येथे सासरी राहत असतांना २०११ ते सात जुलै २०२१ या कालावधीत वर्णावरून वारंवार हिणवणे. तसेच भागीदारीमध्ये घेतलेल्या घराच्या हक्क सोडपत्रावर सही करण्यास आणि जबरदस्तीने घटस्फोट देण्यासाठी मानसिक त्रास देत पतीसह सासरकडच्या मंडळींनी छळ केला.

या त्रासाला कंटाळून विवाहिता किरण हिने ७ जुलै रोजी राहत असलेल्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

या फिर्यादीनुसार पुण्यातील वाकड पोलिसात विवाहितेचा पती संदीप कांतीलाल पाटील (वय ४०), सासरे कांतीलाल झावरू पाटील (वय ५६) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान विवाहितेचे सासरचे हे जळगाव जिल्ह्यातील साळवा ता.धरणगाव येथील मुळ रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com