मोबाईल चोरणार्‍या दोघांना अटक
Crime

मोबाईल चोरणार्‍या दोघांना अटक

तक्रारीनंतर अवघ्या काही तासाच शहर पोलिसांची कारवाई

जळगाव - Jalgaon

शहरात टॉवर चौकात गर्दीचा फायदा घेत गणपती मूर्ती खरेदीसाठी आलेल्या नागरीकांचे मोबाईल लांबविल्याची घटना शुक्रवार १० सप्टेंबर रोजी दुपारी घडली होती. (poloice) पोलिसात तक्रार आल्यानंतर शहर पोलिसांनी काही तासातच दोन संशयितांना अटक केली. विजय गुलाबराव पाटील (वय ४६, रा. पिंप्राळा हुडको) हा रिक्षाचालक व धर्मेंद्र प्रकाश भावसार (वय १९, रा. कांचननगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. दोघा संशयितांना शनिवार, ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

१० सप्टेबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त टॉवर चौकात नागरीकांनी गणेश मूर्ती, पुजा साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत विजय गुलाबराव पाटील हा रिक्षाचालक व धर्मेंद्र प्रकाश भावसार या दोघांनी काही लोकांचे मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी राधेशाम कैलास पांडे (वय २२, रा. शनिपेठ) यांच्या खिशातील ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला होता.

पांडे यांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. यानंतर पोलिस कर्मचारी रतन गिते, मनोज पाटील, भास्कर ठाकरे, गणेश पाटील, संतोष खवले यांनी लागलीच टॉवर चौक, जिल्हा परिषद भागात गस्त सुरू केली. संशयितपणे फिरणार्‍या तरुणांची चौकशी केली. यात विजय पाटील व धर्मंेद्र भावसार हे दोघे पोलिसांना पाहुन पळुन जाण्याच्या तयारीत होते. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून पांडे यांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांनी आणखी (Mobile) मोबाईल चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com