वेबसाइटवर पाहिले मृत्यु कसा होतो... अन् विद्यार्थ्याने घेतला गळफास

जळगावातील धक्कादायक घटना
वेबसाइटवर पाहिले मृत्यु कसा होतो... अन् विद्यार्थ्याने घेतला गळफास

जळगाव - Jalgaon :

मोबाइलमध्ये वेबसाइट ओपन करून त्या वेबसाइटवर जन्म तारीख टाकली मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिले आणि वेऴाने मोबाईलमध्ये पाहिल्याप्रमाणेच,

गळफास घेऊन तुकारामवाडीत हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर वय १३ रा शिंदखेडा ता. धुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अाज २ वाजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे चौकशीत त्यांनी मुलाकडील मोबाइल जप्त केला आहे.

करोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून हर्षल ऊर्फ सोन्या हा तुकाराम वाडीतील त्याचे मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता.

आजी काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्याने मोबाईलमध्ये अनेक प्रकारच्या वेबसाइट बघितल्या व यानंतर बाथरूममध्ये जाऊन साडी बांधून गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com