रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
जळगाव

रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

Balvant Gaikwad

जळगाव । कुळवाडी भूषण, जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी जिल्हयासह शहरात विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना विविध रॅली, मिरवणूकांव्दारे अभिवादन करण्यात आले. दिवसभर शहरात विविध ठिकाणी पुतळ्यांसह प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषा भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आमदार मंगेश चव्हाण, महापौर भारती सोनवणे, जैन उद्योग समूहाचे चेअरमन अशोक जैन, सचिव सचिन पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गफ्फार मलिक, मंगला पाटील, बच्छाव, मनोज पाटील, सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, मुकुंद सपकाळे, लीलाधर तायडे, डॉ.प्रताप जाधव, पुरुषोत्तम चौधरी, दिलीप सपकाळे, राजू मोरे, अश्फाक पिंजारी, डॉ सत्यजित साळवे, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. मिलिंद बागुल, प्रा.पानपाटील, प्रा.जाधव, प्रा.वळवी आदींच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्यानंतर शोभायात्रा निघाली. यात मुस्लिम महिलांचा देखील सहभाग उल्लेखनीय होता. तसेच विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझीम, झांज पथकांनी उत्तम सादरीकरण केले. स्वामी समर्थ विद्यालय (कुसुंबा) या शाळेचे ढोल व झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधल. शिवजन्माचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात आलेला होता. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना महाराज दिलासा देतात, या सजीव देखाव्याने अनेकांचे डोळे दिपवले. हा देखावा विकास मराठे यांच्या 16 कलावंतांनी साकारला. योगा शिक्षिका अनिता पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी चौका-चौकात नयनरम्य योग प्रात्यक्षिक सादर केले. तर मल्लखांब व रोप-वे प्रात्यक्षिक प्रशिक भोई यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. मनपाचा शिक्षण विभागाचा स्वच्छतेचा संदेश देणारा रथ आकर्षक ठरला. इकरा शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती एकात्मतेचे प्रतिक ठरले. यात 40 घोड, 2 ट्रेलर आदी होते. खुशाल पाटील, समीर जाधव, चेतन पाटील, कृष्णा पाटील, भगवान शिंदे, किरण पाटील, विवेक सूर्यवंशी, हिरेन पाटील, अविनाश बाविस्कर, एम.पी.एल.चे प्रमुख हिरेश कदम आदींनी रॅलीचे नियोजन केले.विविध ठिकाणी पाणी, सरबत, बिस्कीट, केळी वाटप करण्यात आले. या कामी जैन उद्योग समूह, राजू अडवाणी, गुजरात स्वीट स्मार्ट, कैलास सोनवणे, पराग घोरपडे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. समितीचे समन्वयक शंभू पाटील यांनी पुन्हा एकदा चौक सुशोभिकरण आणि रस्ता नामकरण प्रस्ताव मांडला. त्याला महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे

लोककल्याणकारी शिवाजी महाराज जयंती समिती

लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवरायांची मिरवणूक दुपारी निघाली. मिरवणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.राजुमामा भोळे, माजी आ. चंदूअण्णा सोनवणे, लोककल्याणकारी समितीच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा शिंदे, संयोजक फारुख शेख, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, गफ्फार मलिक, अ. करीम सालार यांचेसह मोठ्या प्रमाणावर राजकीय पदाधिकारी, नगरसेवक, इतर मान्यवर उपस्थित होते.समितीच्या मिरवणूक छत्रपती क्रीडा संकुल येथून निघूने कोर्ट चौक, नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, गोलाणी मार्केट मार्गे शिवतीर्थ मैदान येथे विसर्जित करण्यात आली. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच कोर्टचौकाजवळ जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुतळ्याचे पूजन करुन अभिवादन केले. मिरवणुकीस 3.30 वाजता क्रीडा संकुलापासून सुरुवात झाली. या मिरवणुकीत विविध शाळा, आदिवासी मुला मुलींचे वसतीगृह मिरवणुकीत ढोल ताशे, लेझीम पथक, जिमनॅस्टिक, पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. काही मुलांनी एका हाताने काठी फिरवून दाखविली. तर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नंदुरबार येथील व आदिवासी मुलामुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध आदिवासी नृत्ये यावेळी सादर केली. मोठे आकर्षण हे या मिरवणुकीत होते. तसेच आदिवासी बांधवांचा एक गृपनेही आदिवासी शैलीतच पेहराव करुन वेगवेगळे आदिवासी नृत्य चौकाचौकात सादर केले. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे, जिजाउ मॉ यांच्या गणवेशात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी पेहराव केलेला होता. या पेहरावात आस्था पुनम राजपुत, दिप्ती लढे, ईश्वरी पाटील यांनी हुबेहुब परिधान केले होता. छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीनिमित्ताने शिवतीर्थ मैदानावर झेप प्रतिष्ठान, एकु.एस.गृप, मनसे, भारतीय भ्रष्टाचार निवारण समितीतर्फे तसेच कुलावंत सेवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान दरवर्षाप्रमाणे घेण्यात आली. दीपप्रज्वलन महापौर भारती सोनवणे, उपमहापौर अश्विन सोनवणे यांनी केले. यावेळी यात मनसेचे अविनाश पाटील यांचेसह जवळपास 60 ते 65 जणांनी रक्तदान केले. याकामी परिश्रम अविनाश पाटील, संदीप मांडोळे, आकाश साळुंखे, संदीप पाटील, परशुराम सपकाळे,, मनोज लोहार, योगेश पाटील, शुभम सुर्यवंशी, योगेश कोल्हे, प्रसाद गायके, गौरव यादव, विजय देवरे आदींनी परिश्रम घेतले. छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीनिमित्ताने शिवाजी पुतळ्याजवळ सकाळपासून युवक काँग्रेसतर्फे मोफत शुध्द पाणीवाटप करण्यात येत होते. युवक काँग्रेसतर्फे पराग घोरपडे, हितेश पाटील यांचेतर्फे हा उपक्रम होता. या मिरवणूकप्रसंगी मनपा नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक भगत बालाणी, नगरसेवक मनोज पाटील, समिती खजिनदार प्रमोद पाटील, बाफना ज्वेलर्सचे मनोहर पाटील, ग.स.चे अध्यक्ष मनोज पाटील, जयश्री पाटील, मनिषा पाटील, निलू इंगळे, आरपीआयचे नितीन अडकमोल, गजानन मालपुरे, भारत ससाणे, संजय तांबे, रवी देशमुख, शिवसेनेचे पुनम राजपूत, बंटी काळे, विनोद देशमुख, मानसिंग सोनवणे, अमोल कोल्हे, संजय पवार, योगेश चौधरी, हितेश पाटील, साजीदभाई शेख आदींचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com