जळगाव : अवैधरित्या दारू विक्री ; तरुणास अटक
जळगाव

जळगाव : अवैधरित्या दारू विक्री ; तरुणास अटक

हनुमाननगरातील प्रकार

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना हनुमाननगरात अवैधरित्या दारू विक्री करणार्‍या एका तरुणास शनिवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

त्याच्याजवळील १७ हजार ४७२ रूपये किमतीचे टँगो पंच कंपनीच्या देशी दारुचे खोके पोलिसांनी जप्त केले.

पोलिसांनी हनुमाननगर परिसरात शनिवारी रात्री १०.१३ वाजेच्या सुमारास धाड टाकली. अर्जुन पोपटराव आहेर (वय ३५, रा. हनुमाननगर, मूळ.रा.पिंपळगाव, जि.नाशिक) हा एका घरात भाडेकरू म्हणून राहतो.

तो महामार्गावरील कालिंकामाता मंदिरासमोर डी.एस.साळुंखे यांच्या देशी दारुच्या दुकानात मॅनेजर म्हणून कामाला आहे. त्याने या दुकानातून १७ हजार ४७२ रुपये किंमतीची टँगो पंच देशी दारू विकत घेतली होती. तो अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून त्यांच्याजवळील टँगो पंचचे सहा बॉक्स हस्तगत केले.

याबाबत कॉन्स्टेबल नीलेश पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन अवैधरित्या दारू विक्री व लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, कॉन्स्टेबल असीम तडवी, सचिन पाटील, नीलेश पाटील यांनी केली. तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com