जळगाव : न्यु इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
जळगाव

जळगाव : न्यु इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

Balvant Gaikwad

जळगाव ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित न्यु. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दि.13 फेब्रुवारी 2020 रोजी वार्षीक पारितोषिक समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला.

सामाजिक जाणिवाचं, संस्कृतीचे दर्शन घडविणारे बक्षीस वितरण व स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.केतन ढाके, व्ही.डी.जोशी जळगाव यांची उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन संस्थेचे अध्यक्ष व शाळेचे स्कुल कमिटीचे चेअरमन अरविंद लाठी, संस्थेचे उपाअध्यक्ष दिलीपभाऊ लाठी, सचिव मुकुंदभाऊ लाठी, सदस्य विजयभाऊ लाठी, शालेय समिती सदस्य आशिष जी मुंदडा, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष यांच्या हस्ते शाळेतील विविध स्पर्धेतील बक्षिसपात्र गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करुन यथा योग्य संमान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातील व स्पर्धा युगातील यशस्वीतेबद्दल मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात अरविंद लाठी यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही विद्यार्थ्यांच्या भविष्यात अभ्यासासोबत खेळाचे महत्त्व विषद केले. यांनतर झालेल्या रंगारंग सांस्कृतीक कार्यक्रमात नर्सरी ते नववीच्या वर्गातील मुलांनी सहभाग नोंदविला यात मुलांनी ‘ये नदिया…ये तारे’, ‘काळ्या मातीत मातीत’, ‘सन आयला गो नारळी पेनवेचा..’ ‘शेंदुरलाल चढाओ’, ‘वतन तेरा जलवा जलवा’…‘संदेसे आते हे, पेट्रोटीक साँग रिमिक्स’ अशा या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती सादर केली .

यातील पुर्वप्राथमिक विभाग, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग या विभागातील नृत्य संघांनी विजय मिळवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश पाटील, सौ.चारुशिला जगताप व सोनाली जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे परिक्षण गिरीष जाधव व देवेंद्र गुरव यानी केले. कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम गायनाने झाला.

Deshdoot
www.deshdoot.com