बलात्कारप्रकरणी दोघं आरोपी पोलिसांना शरण
जळगाव

बलात्कारप्रकरणी दोघं आरोपी पोलिसांना शरण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवरील बलात्कारप्रकरणी दोघं आरोपी पोलिसांना गुरुवारी शरण आले.

एका अल्पवयीन तरुणीचे तिच्या परिसरातीलच तेजस दिलीप सोनवणे (वय 20)े याच्यावर प्रेम होते. ही तरुणी दहावीच्या परीक्षेतील निकाल घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2019 रोजी शाळेत गेली होती. त्यानंतर घरी जाताना तेजस सोनवणे आला. तेजसने त्या तरुणीला मोटारसायकलवर बसवून कोल्हे हिल्स टेकडीवर घेवून गेला.

त्यांच्या नंंतर चेतन पितांबर सोनार (वय 20) हा देखील त्याच्या मोटारसायकलवर कोल्हे हिल्सवर गेला. गप्पा केल्यानंतर कोल्हे हिल्सवरील एका इमारतीच्या बाजूला तेजसने तरुणीवर अत्याचार केला.

या प्रकाराचे फोटो चेतन याने मोबाइलच्या सहाय्याने चोरुन काढले होते. या घटनेनंतर तरुणीने तेजस याच्याशी संपर्क तोडला. या कालावधीत चेतन सोनार याने तरुणीसोबत वर्षभर जवळीक निर्माण केली. तो देखील त्या तरुणीला फेब्रुवारी 2020 मध्ये कोल्हे हिल्सवर घेवून गेला. त्याने तेजसने केलेल्या अत्याचाराचे फोटो तरुणीला दाखविले. फोटो बघताच तरुणी हादरली.

त्याने तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. अन्यथा अत्याचाराचे फोटो व्हायरल करुन तिच्या कुटुंबीयांची देखील बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानेही तरुणीवर अत्याचार केले. यानंतर सुद्धा ते दोघं तरुण त्या तरुणीवर शेरबाजी करीत होते.

तरुणीची आपबिती

ते दोघांसोबत संबंध ठेवण्यासाठी तरुणीला धमकावत होते. या प्रकाराला कंटाळून त्या तरुणीने तिच्या आई, वडिलांकडे आपबिती कथन केली.

तिच्या फिर्यादीवरुन तेजस सोनवणे व चेतन सोनार यांच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत 13 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झााला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघं तरुण गुरुवारी सायंकाळी शनिपेठ पोलिसांना शरण आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com