मळगावच्या तरुणाचा  शिवरेफाट्यानजीक मृत्यू
जळगाव

मळगावच्या तरुणाचा  शिवरेफाट्यानजीक मृत्यू

Balvant Gaikwad

पारोळा-कजगाव रस्त्यावरील शिवरे फाट्यानजीक एका 32 वर्षीय तरुणाची मोटरसायकल घसरल्याने त्याच्या डोक्यात मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 27 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सुभाष शामराव मरसाळे (32 रा.मळगाव ता.भडगाव) हा एम-एच-19 सी- इ-4492 वर पारोळा कडून भडगाकडे जात असतांना शिवरे फाट्यानजीक त्याची मोटरसायकल घसरल्याने त्याच्या डोक्यात जबर मार लागला.

त्यास पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, सुमित राजपूत, पोलीस पाटील राजपाल चौधरी, संतोष पाटील, नामदेव महाजन, ताराचंद महाजन, रोशन पाटील यांनी मदत केली व 108 रुग्णवाहिका पाचारण केले मात्र डा.प्रविण पाटील यांनी त्यास तपासले असता तो मृत झाल्याचे घोषित केले.

मृत सुभाष मरसाळे यास रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Deshdoot
www.deshdoot.com