जळगाव - Jalgaon :

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील जय गुरूदेव इंडस्ट्रीज अॅन्ड वेअर हाउसिंग परिसरात गेल्या दीड महिन्यापूर्वी अन्न औषध प्रशासनाकडून धाड टाकली होती.

यावेळी शुगर बॉईल्ड कन्फेनरीचे विक्री करीता तसेच डोमेस्टिक उत्पादन करतांना आढळून आले होते.

परंतु तेथील अस्वच्छ ठिकाणी धुळ कचरा अडगळीत शुगर बॉईल्ड कन्फेनरीचा कच्चा मालाचे 50 कि.गॅ.वजनाचे 200 कट्टे आढळून आल्याने कच्च्या मालाचे नमुने घेउन 3 लाख 10 हजार रूपये किमतीचा उर्वरीत सर्वसाठा जप्त करण्यात आला होता.

असुरक्षित घोषित अशा आलेल्या अहवालानुसार अन्न सुरक्षा मानकांनुसार अन्न औषध सहायक आयुक्त यों.को.बेडकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी कारवाई केली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.